Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे’ च्या वतीने 14 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा

 

Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे’ च्या वतीने 14 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा

नोंदणी प्रक्रियेस प्रारंभ

Pckhabar- मावळ तालुक्यात मागील 24 वर्षांपासून ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे’ यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने यावर्षी रौप्य महोत्सवी विवाह सोहळा शनिवार दि.14 मे 2022 रोजी होणार आहे. यासाठीच्या नोंदणी प्रक्रियेस रविवारी श्री डोळसनाथ महाराज मंदिर,तळेगाव दाभाडे येथून सुरुवात करण्यात आली.

यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले,
‘कोरोना महामारीच्या संकटात भव्य दिव्य लग्नसोहळे टाळून अगदी मोजक्या नातेवाईकांमध्ये विवाह झालेले आपण पाहिले. त्याचप्रमाणे नाहक खर्च टाळून सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा परंपरेप्रमाणे विवाह संपन्न होतात आणि त्यासाठी सर्वांनी प्रबोधन केले पाहिजे. सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना समाजमनात रुजवली गेली पाहिजे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *