Talegaon Dabhade News : जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमणी संवर्धन उपक्रमाचे उद्घाटन


Talegaon Dabhade News :
जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमणी संवर्धन उपक्रमाचे उद्घाटन

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमणी संवर्धन उपक्रमाचे उद्घाटन व पर्यावरण मित्रांचा सन्मान तळेगाव दाभाडे येथे करण्यात आला. तसेच पक्षी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अविज् फाऊंडेशनचा लोगो अनावरण करण्यात आला.

यावेळी आमदार सुनील शेळके, रो.अध्यक्ष राजेश गाडे, उपाध्यक्ष दिपक फल्ले, सदस्य दादासाहेब उऱ्हे, प्रकल्प प्रमुख अविनाश नागरे, सह-प्रकल्प प्रमुख संतोष शेळके, वैशाली खळदे, वन अधिकारी सिद्धेश्वर महाजन आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले,
ग्लोबल वार्मिंग आणि निसर्गाचा होत असलेला ऱ्हास यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. सिमेंट काँक्रीटची जंगले वाढत असल्याने चिमण्यांचा वावर कमी झाला आहे. मात्र पर्यावरण व पक्षी संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या अशा संस्थांकडून कृत्रिम घरटी, बर्ड फिडर इत्यादींच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाचा प्रयत्न होत आहे. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरी भागात चिमणी संवर्धनाबाबत जनजागृतीचे मोठे कार्य आपण करीत आहात. आपल्या या निसर्ग संवर्धन उपक्रमास माझ्याकडून शुभेच्छा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *