Pimpri News : मोठी ध्येय गाठण्यासाठी युवकांनी पुढे या – आयुक्त राजेश पाटील

Pimpri News : मोठी ध्येय गाठण्यासाठी युवकांनी पुढे या – आयुक्त राजेश पाटील

खान्देश मराठा पाटील समाज संघाच्या वर्धापदिनानिमित्त विविध मान्यवरांचा सन्मान

Pckhabar- खान्देशातील मराठा पाटील समाजाकडे एक मेहनती व कष्टाळू समाज म्हणून पाहिले जाते. कष्ट आणि जिद्दीने समाजातील काही तरुणांनी उद्योग – व्यवसाय, शिक्षण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव उंचावले आहे. असे असताना देखील आजचा तरुण वर्ग आपल्या ध्येयापासून भरकटलेला आहे, शिक्षणामध्ये परिस्थिती कधीही आडवी येत नसून मनात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तरुणांनी मोठी ध्येय गाठली हवीत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले. अहिराणी भाषा ही खूप गोड भाषा आहे, या भाषेचा सर्वांना अभिमान हवा, खानदेशात नव्हे तर आपण ज्या शहरी भागात राहतो, त्या ठिकाणी देखील अहिराणी भाषेचे संवर्धन व्हायला हवे, असेही ते म्हणाले.

खान्देश मराठा पाटील समाज संघाच्या वतीने वर्धापदिनानिमित्त विविध मान्यवरांचा गौरव सोहळा शनिवारी आकुर्डी येथील खंडोबामाळ येथे पार पडला. यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना आयुक्त राजेश पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, उद्योजक दिपक पाटील, खान्देशी अभिनेता सचिन कुमावत, अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके (खान्देश भूषण), डॉ. नरेंद्र देवरे सर (शिक्षणरत्न), लेखक मो. ग. चव्हाण (कलागौरव पुरस्कार), उद्योजक योगेश पाटील (उद्योगरत्न), ज्येष्ठ पत्रकार शीतल पवार (समाज भूषण), निलेश दिनकर पाटील (उद्योगरत्न), लोकनियुक्त सरपंच थाळनेर प्रशांत पाटील (समाज भूषण पुरस्कार), API दिनेश पाटील (कार्यगौरव), उद्योजक नितीन पाटील (उद्योगरत्न) पुरस्कार, निवेदक राखी भामरे (खान्देशरत्न युवा पुरस्कार) या मान्यवरांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच, उद्योजक गुलाब पाटील, उद्योजक दिलीप पाटील, दिपक पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान, लकी ड्रॉ द्वारे अर्चना पाटील, अनिता किशोर पाटील, वैशाली पाटील, सुरेखा अहिरे, पुषा पाटील या महिलांचा पैठणी देवून सन्मान करण्यात आला. तसेच, कानबाई चालली सासरले, बबल्या इकस केसावर फुगे… फुगे घ्या फुगे…, जत्रा म्हा म्हले तू काय लि देशी…, सावन महिना म्हां… जीव रंगणा ये…, आदी अहिराणी गीतांवर उपस्थितांनी ठेका धरला. तसेच, उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष उद्योजक महेंद्र नारायण पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मार्गदर्शक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भांबरे यांच्यासह समाज बांधवांचे कार्यक्रम संयोजनासाठी सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *