Maval News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मावळ दौऱ्यावर

Maval News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मावळ दौऱ्यावर

Pckhabar- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार) मावळ तालुका दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. फडणवीस येणार असल्याने मावळ भाजपने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.

सकाळी पावणे बाराच्या सुमारास त्यांचे मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या निवासस्थानी आगमन होईल. याठिकाणी काही वेळ त्यांनी राखीव ठेवला आहे.

त्यानंतर दुपारी पावणे दोनच्या सुमारास अखिल भारतीय बैलगाडा संघटना व मावळ तालुका शिवजयंती उत्सवाच्या वतीने इंदोरी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यत घाटात ते उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमानंतर ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी दुपारी पावणे तीनच्या सुमारास रवाना होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *