Pimpri News : महानगरपालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयाचे चिखली येथे स्थलांतर

Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयाचे चिखली येथे स्थलांतर झाले आहे अशी माहिती भुमि आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.

विशेष नियोजन प्राधिकरण कक्ष या पूर्वी आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील पुर्वीच्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये सुरु होते. आता या कार्यालयाचे स्थलांतर झाले असून चिखली जाधववाडी येथील राजे शिवाजीनगर, चिखली प्रभाग क्र. २, सेक्टर क्रमांक १६ येथील सावतामाळी उद्यानातील व्यायामशाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विशेष नियोजन प्राधिकरण कक्षाचे कामकाज चालणार आहे. सर्व अर्जदार आणि नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन देखील सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी केले.










Leave a Reply