Maval News : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना CorBevax vaccine देण्यास सुरुवात

Maval News : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना CorBevax vaccine देण्यास सुरुवात

304 विद्यार्थ्यांना दिली लस

Pckhabar- इंदोरी येथे 12 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना CorBevax लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 304 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.

ज्योती शिंदे,सभापती,पंचायत समिती मावळ, जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ( बुधवार) प्रगती विद्या मंदिर, इंदोरी, येथे CorBevax या लसीचे उद्घाटन श्री दिलीप ढोरे ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मावळ,श्री संदीप काशीद पाटील सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती, श्री प्रशांत भागवत माजी उपसरपंच, श्री अंकुश ढोरे माजी उपसरपंच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षस्थानी ढोरे म्हणाले की बारा ते चौदा वर्षाखालील सर्व मुलाने 100% लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
12 ते 14 वयोगटातील करिता CorBevax लस ही अत्यंत गुणकारी व सुरक्षित असून यामध्ये कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र मोहिते यांनी यावेळी मार्गदर्शनपर सांगितले.

यामध्ये 12 ते 14 वयोगटातील 304 विद्यार्थ्यांना CorBevax लस देण्यात आली. यावेळी 100% शाळेचे लसीकरण करण्यात आले. प्रगती विद्या मंदिर इंदोरीचे प्राचार्य संजय वंजारे, पर्यवेक्षक चंद्रकांत धनवे, शहाजी लाखे, लक्ष्मण मखर, विनोद भोसले, आरोग्य निरीक्षक श्री सुधाकर चाबुकस्वार, डॉक्टर अमिता राज्याध्यक्ष समुदाय आरोग्य अधिकारी, श्रीमती मृदुला देवलापूरकर आरोग्य सेविका विद्या खांदवे,श्री महादेव येळवंडे आरोग्य सेवक, श्रीमती श्वेतांजली चव्हाण आशा सेविका, डाटा ऑपरेटर म्हणून मोंडेलिस संस्थेचे कर्मचारी,रुग्णवाहिका चालक श्री सखाराम खोपे यांनी सदर मोहिम यशस्वी करणे करिता परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *