Pimpri Crime News : उद्योजक गायकवाड बाप-लेकावर आणखी एक ‘मोक्का’

Pckhabar-औंध येथील उद्योजक गायकवाड बाप-लेकासह त्यांच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) आणखी एक कारवाई केली. यासंदर्भात ९ मार्च रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत.

टोळीप्रमुख गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६) आणि नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध) या बाप- -लेकासह संदीप गोविंद वाळके, सचिन गोविंद वाळके (दोघे रा. विधाते वस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश (रा. पिंपळे गुरव), अॅड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर (रा. लिंक रोड, बाणेर) आदीवर मोक्का कारवाई झाली आहे. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार, ९ मार्च रोजी कारवाईचे आदेश देण्यात आले. गणेश व नानासाहेब या बाप-लेकासह इतर तीन साथीदारांवर यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्येही मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे.










Leave a Reply