Pimpri News: कार्यकाळ संपला अन् महापौर माई ढोरे दुचाकीवरून घरी गेल्या..!

Pimpri News: कार्यकाळ संपला अन् महापौर माई ढोरे दुचाकीवरून घरी गेल्या..!

Pckhabar-  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज (रविवार)  पूर्ण झाला. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महापौर माई ढोरे या सरकारी वाहन महापालिकेला जमा करीत आपल्या दुचाकीवरून घरी परतल्या.

दरम्यान, माई ढोरे घरी परतत असताना महापालिकेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक भावुक झाले होते. माई ढोरे यांच्यासोबत सेल्फी घेत हा क्षण जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढे गेली आहे. त्यामुळे दि. 14 मार्चपासून महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ दि. 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *