Pune News : योगशिक्षक आणि मुल्यांकन कर्ता परिक्षेत अश्विनी लाडेगांवकर यांचे यश

Pckhabar- देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचलितयोगा प्रमाणीकरण मंडळ ,नवी दिल्ली द्वारे घेतल्या जाणाऱ्या योग शिक्षक व मुल्यांकन कर्ता लेवल ३ परिक्षेत वारजे पुणे, येथील अश्विनी लाडेगांवकर यानी यश संपादन केले आहे.
ही परिक्षा आँनलाईन माध्यमातून प्रात्यक्षिक व सिध्दांतीक स्वरुपात घेतली जाते. या परिक्षेसाठी साधारण एक महिन्याचा प्रशिक्षण व आभ्यासाकरीता मिळतो . या परिक्षेसाठी त्यांना पतंजली योग पिठाचे योगगुरु श्री श्रीराम लाखे (वकील),श्री वल्लभ जोशी आणि श्री रत्नाकर कुलकर्णी यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. अश्विनी ह्या शाळा ,वैयक्तिक हेल्थ क्लब ,सोसायटी यातील लहान मुला मुलींना व ७० वर्षापर्यंतच्या स्त्रियांना जलतरण प्रशिक्षण देत आल्या आहेत. त्यांनी B.A. मधून मानसशास्त्राची पदवी घेतली असून त्या सध्या स्पोर्ट न्युट्रीशियन सल्लागार आहेत. Pandemic मुळे २.५ वर्षापासून घरी राहिल्याने व स्वतःला कोरोना झाल्याने समाजातील लोकांना मानसिक व शारीरिक त्रास कशाप्रकारे झाला याचा त्याना जवळून आभ्यास करता आला. स्वतः कोरोना रुग्ण असताना कोणतीही भिती ,मानसिक खच्चीकरण न करता केवळ योग व योग्य आहार यामुळे यातून त्या व त्यांचे कुटुंब सहज बाहेर पडले. त्यामुळेच योगामध्ये जास्त रुची निर्माण झाली व यांत सखोल अभ्यास करायचे ठरले.

अध्यात्मिक संस्कार लाभलेल्या रामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्र , भादोले येथील प.पु.स्वामी सेवानंद महाराज यांच्या वडील बंधूंची मुलगी आहेत .त्यामुळे आध्यात्म ,मानसिक व शारीरिक स्तरावर योग कसा परिणाम करून त्यांत कशी प्रगती करता येते याची त्यांना प्रचिती आली .त्यामुळे योगातुन समाजकार्य व देशसेवा करण्याची संधी त्याना दिसून आली. यात त्यांना त्यांची बहिण सौ.अंजली पाटील व सारिका सेजल यांच्या मदतीने या YCB keval 3 चे मार्गदर्शन घ्यायचे ठरवले.
पतंजली योगपीठ योगगुरू श्री श्रीराम लाखे, श्रीवल्लभ जोशी व श्री रत्नाकर कुलकर्णी या सर्वांचे अचूक व अमुल्य मार्गदर्शन मिळाले.
गुरुंचा विश्वास ,आईवडीलांचा आशिर्वाद ,पती, इतर परिवार, हितचिंतक आणि निसर्गाची साथ व आत्मविश्वास यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले.याबद्दल मी या सर्वांची ऋणी आहे असे म्हणत त्यांनी सर्वांबद्दल आभार व्यक्त केले.










Leave a Reply