Pimpri News : प्रीतम प्रकाश महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

Pckhabar- जगण्याच्या लढाईत शिक्षणापासून दूर राहिलेल्या समाजाला शिक्षणाचा न्याय हक्क मिळवून देण्याचे काम आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी केले. जगण्याची लढाई प्रत्येकालाच करावी लागते रोजीरोटीचा प्रश्न प्रत्येकाला सोडवायचा असतो जगण्याच्या लढाईत बरोबर शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे फार मोठे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले असे विचार यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. भास्कर पांडुरंग यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू असून त्यात बी. ए., बी. कॉम, एम.ए. एम.कॉम, एमबीए हे अभ्यासक्रम गेली सात वर्ष अभ्यास केंद्राचे कामकाज सुरू आहे.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्रप्रमुख सदाशिव कांबळे यांनी मार्गदर्शन करताना शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा चालविण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केलेले वास्तव व शाश्वत विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. सचिन पवार यांनी वाचनातून माणूस घडतो हे यशवंतराव चव्हाण यांच्या उदाहरणातून सांगितले आजच्या विद्यार्थ्यानी यशवंतरावांचा आदर्श समोर ठेवून काम करावे. त्यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र जरूर वाचावे असे सांगितले.
यशवंतराव चव्हाण जयंती आयोजनामध्ये मा. प्राचार्य व केंद्रप्रमुख सदाशिव कांबळे, केंद्र संयोजक प्रा. भास्कर पांडुरंग, केंद्र सहाय्यक प्रा. प्रशांत रोकडे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा.सचिन पवार, प्रा. डॉ. स्वाती वाघ प्रा. महालक्ष्मी शिरसाट, प्रा. विभा ब्राम्हणकर, डॉ. उमेश लांडगे, प्रा.प्रवीण मस्के, प्रा. रुपाली आगळे, ग्रंथपाल राजेश कुंभार,सारीका बेलदोर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र सहाय्यक प्रा. प्रशांत रोकडे यांनी केले प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. पांडुरग भास्कर यांनी केले. तर आभार परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी मानले.










Leave a Reply