Pimpri Political News : महापालिका निवडणुकीत रिपाइं 50 जागांवर लढणार

Pimpri Political News : महापालिका निवडणुकीत रिपाइं 50 जागांवर लढणार
Pckhabar- भाजपबरोबर युती असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये 50 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपाइं शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रिपाई पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बाळासाहेब रोकडे, दयानंद वाघमारे, बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, सुधाकर वारभुवन, सम्राट जकाते, के. एम. बुक्तर, , ख्वाजाभाई शेख, दशरथ ठाणांबीर, राजेंद्र कांबळे, लिंबराज कांबळे, दिलीप साळवे, प्रमोद वाघमैतर, बापू सरोदे, बापू वाघमारे, दादा शिरोळे, रमेश शिनगारे, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *