Pune District News : तांत्रिक बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवड, पुण्यात पहाटेपासून बत्ती गुल!

Pune District News : तांत्रिक बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवड, पुण्यात पहाटेपासून बत्ती गुल!

Pckhabar- लोणीकंद ते चाकण दरम्यानच्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने आज पहाटेपासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील बहुतांश भागाची बत्ती गूल झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

लोणीकंद ते चाकण दरम्यान महापारेषणाती मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी पहाटे साडेचारच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर, चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 6 पासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *