Chinchwad News : राष्ट्रउभारणीसाठी चारित्र्याची उपासना आवश्यक : यशोधन आदमाने
Pckhabar- चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण संस्थेचे बाल, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण श्री यशोधन आदमाने (अध्यक्ष: मैत्री परिवार,पुणे शहर), संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव व विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वज गीत, राष्ट्रगीत , व देशभक्ती पर गीत गायन केले.
श्री यशोधन आदमाने म्हणाले की,” सामाजिक मूल्य, शिस्त,मानवता या भावना एकत्रितपणे “चारित्र्य” या संकल्पनेमध्ये सामावलेले आहेत. चारित्र्याची भावना ठेवून देशासाठी काम केल्यास आपण प्रगती करू शकणार आहोत. त्यामुळे राष्ट्रउभारणीसाठी चारित्र्याची जोपासना केली पाहिजे.
याप्रसंगी माध्य.मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील , प्राथमिक मुख्याध्यापक श्री साहेब देवरे, उपमुख्याध्यापक बाळू महाजन प्रा. दत्तात्रय भालेराव किसन आहिरे व लीला मुटकुळे आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शब्बिर मोमिन यांनी केले तर सौ सुजाता बेडेकर यांनी आभार मानले.











Leave a Reply