Big News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण

Big News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण

Pckhabar-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.

 ज्येष्ठ नेते पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने  दोन लाटेत कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे.

आपल्या ट्विटरमध्ये पवार म्हणतात ”माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही  पवार यांनी केले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *