Dehu Election News : देहू नगरपंचायतीच्या चार प्रभागासाठी पहिल्या चार तासात 27.74 टक्के मतदान
Pckhabar- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने देहू नगरपंचायतीच्या उर्वरित राहिलेल्या चार प्रभागातील मतदानाला आज ( मंगळवार) सकाळी साडेसात वाजता उत्साहात सुरूवात झाली. पहिल्या चार तासात 27.74 टक्के मतदान झाले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देहूगाव नगरपंचायतीच्या 13 प्रभागासाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झाले.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक 11,12, 14 आणि 15 यासाठी निवडणूक होत आहे. या चार प्रभागातील देहूतील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान होत आहे.
मतदान आकडेवारी
वेळ – सकाळी 7:30 ते 11:30
पुरुष – 541
स्त्री -438
टक्के वारी -27.74%










Leave a Reply