Pimpri News: स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील  : महापौर माई ढोरे

Pimpri News: स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील  : महापौर माई ढोरे

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराला २०२२ मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून आरोग्य विभागाने नागरिकांशी समन्वय साधून ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी व स्वच्छतेसाठी जनजागृती करावी अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.

आयुक्त दालनात आरोग्य विषयक कामकाजाबाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, उपआयुक्त संदिप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, कचरा संकलनासाठी गाड्या वाढविण्यात याव्यात. नागरिकांच्या घरापर्यंत जाणा-या रस्त्यावर वाहतूक सुरळीतपणे करता येईल अशा आकाराची वाहने नव्याने खरेदी करण्यात यावी. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. स्वच्छतेकामी मनुष्यबळाची कमतरता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे अशा सुचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

 पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, हॉटेलमधील कचरा हॉटेल व्यावसायिकांडून सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येतो अशा हॉटेलवर कारवाई करण्यात यावी. तसेच पुर्वी असणा-या कचरा कुंडीच्या रिकाम्या जागेत नागरिकांनी कचरा टाकू नयेत यासाठी कर्मचारी नेमण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *