Chinchwad News : येवले व कवाडिया कुटुंबाने लग्नाचा वायफळ खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी!

Chinchwad News : येवले व कवाडिया कुटुंबाने लग्नाचा वायफळ खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी!

वर्षभर राबवणार सामाजिक उपक्रम

चिंतामणी रात्र प्रशालेतील १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वाटप

Pckhabar- आज लग्न म्हटले लाखो रूपयांचा चुराडा… मोठ्या प्रमाणात बडेजाव… शेकडो नागरिकांच्या जेवणावळी… या सर्व बाबी लग्नात ठरलेल्या असतातच. मात्र, आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असणारा लग्न सोहळा
येवले व कवाडिया कुटुंबाने नोंदणी पद्धतीने लग्न करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
येवले व कवाडिया कुटुंब पुढील वर्षभर सामाजिक कार्यासाठी मदत करण्याचा दोन्ही परिवाराने निश्चय केला आहे.

समाज कार्यात सातत्याने सक्रिय असलेले निगडी- पुना लायन्स क्लबचे सक्रिय सभासद लायन अशोक येवले आणि उषा येवले यांची कन्या प्रज्ञा अशोक येवले व तिचा मित्र विवेक हरीश कवाडिया यांच्या निखळ मैत्रीचे ३ जानेवारी २०२२ रोजी दोन्ही कुटुंबियांच्या साक्षीने “जीवनाचा साथीदार “असे रूपांतर नोंदणी पद्धतीने झाले. थोरांचे आशीर्वाद व सदभावना यांच्या जोरावर त्यांनी सुखी संसाराची सुरुवात केली आहे.

लग्नात कुठलाही वायफळ खर्च होता कामा नये ही दोघांची इच्छा. वर्षभर गरजूंना मदत करुन सत्पात्री दानाचा त्यांनी संकल्प केला आहे.

त्याची सुरुवात ८ जानेवारी २०२२ रोजी चिंतामणी रात्र प्रशालेतील १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या पुस्तक वाटपापासून झाली आहे.रात्र प्रशाळेचे प्राचार्य श्री लंके,श्री राजेंद्र सोनवणे,श्री वाघमारे व सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व प्रज्ञा आणि विवेक यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

ऋण काढून सण साजरा करण्याच्या प्रवृतीला यामुळे आळा बसेल व कैक संसार उध्वस्त होण्यापासून वाचतील असा संदेश श्री लंके सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला. लायन उषा व अशोक येवले.
सौ नंदिनी व कर्नल हरीश कवाडिया,
मोनाली येवले व वरुण लोकरस यांच्यासह येवले व कवाडिया परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *