Dehugaon Election News : प्रभाग 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पौर्णिमाताई परदेशी-गोळे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pckhabar- देहू नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पौर्णिमाताई विशाल परदेशी- गोळे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रचाराला काही दिवस बाकी असून परदेशी यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पौर्णिमाताई विशाल परदेशी- गोळे यांनी घरोघरी जाऊन प्रचार करून मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर देत आहेत. कार्यकर्त्यांचा संच, प्रचाराचे नियोजन, प्रभागातील मतदारांशी असलेला दांडगा संपर्क व पौर्णिमाताई परदेशी यांचे पती विशालभैय्या परदेशी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या विविध समाज उपयोगी कामांच्या जोरावर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून विशालभैय्या परदेशी दिल दोस्ती मित्र परिवाराच्या माध्यमातून देहूगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांनी केलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर त्यांच्या पत्नी पौर्णिमाताई परदेशी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्यासाठी व देहूच्या विकाससाठी एक मत राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे आवाहन पौर्णिमाताई परदेशी यांनी केले आहे.
विशालभैय्या परदेशी यांनी
कोरोना संकटकाळात गरजूंना अन्न-धान्य वाटप केले. आईच्या स्मरणार्थ विविध संस्थांना आर्थिक मदत केली. श्री क्षेत्र इंदुरी येथील दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्ट मंदिराला गोदान केले. तसेच कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असताना परदेशी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या सारखे विविध सामाजिक उपक्रम विशालभैय्या परदेशी यांनी राबवले आहेत. परदेशी यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

पौर्णिमाताई परदेशी- गोळे म्हणाल्या ” माझे पती गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देहू गावातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. पतीच्या पावलावर पाऊल टाकत मी निवडणूक रिंगणात उतरली आहे. प्रभाग 11 मधील मायबाप जनता सेवा करण्याची नक्कीच संधी देतील, असा विश्वास पौर्णिमाताई परदेशी यांनी व्यक्त केला.
तसेच राजकारण हे समाजकारण आणि मायबाप जनतेची सेवा करण्याचे माध्यम म्हणून आम्ही पाहत आहोत. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या तत्त्वानुसार आम्ही कार्यरत असल्याचे
पौर्णिमाताई म्हणाल्या.”











Leave a Reply