IPL News : विवो नाही आता टाटा आयपीएल!

IPL News : विवो नाही आता टाटा आयपीएल!
Pckhabar- जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. सर्व संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच या स्पर्धेत अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेली चिनी मोबाईल कंपनी विवोने  प्रायोजकत्व मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतातील टाटा कंपनी आयपीएलचे नवे मुख्य प्रायोजक असणार आहे.

आज (मंगळवार) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएल धोरणी कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी याबाबत घोषणा केली. विवोचा करार अद्याप संपलेला नव्हता. ते २०२३ पर्यंत आयपीएलचे मुख्य प्रायोजक राहणार होते. मात्र, त्यांनी अचानकपणे माघार घेतल्याने आता आयपीएल ‘टाटा आयपीएल’ (TATA IPL) या नावाने ओळखली जाईल. टाटा व बीसीसीआय यांच्यातील या प्रायोजकत्व कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *