Pimpri Corona News : कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख ; आज 1 हजार 706 नवे रुग्ण; 387 रुग्णांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (मंगळवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 1 हजार 706 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. 387 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 87 हजार 919 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 8 हजार 13 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 7 हजार 610 रुग्ण गृहविलगीकरणात असून 403 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 4 हजार 527 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 31 लाख 12 हजार 796 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply