Pimpri Corona News : आज कोरोनाचे 1 हजार 276 नवे रुग्ण; 230 रुग्णांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (सोमवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 1 हजार 276 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. 230 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 86 हजार 213 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 6 हजार 694 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 6 हजार 269 रुग्ण गृहविलगीकरणात असून 425 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 30 लाख 95 हजार 260 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.










Leave a Reply