Pimpri News : महापालिकेचे वायसीएम रूग्णालय इतर रुग्णांसाठी राखीव
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय इतर रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आज (सोमवार) दिली. तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चिखली घरकुल येथील दोन कोविड सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात आजअखेर सहा हजार 694 रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामधील 6 हजार 269 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. 425 रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या दोन लाटेमध्ये वायसीएम रूग्णालयासह इतर रूग्णालयात कोरोना
रुग्णांवर उपचार केले जात होते. इतर आजार झालेल्या रुग्णांचे मोठे हाल झाले होते. या कालावधीत अनेक शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. इतर आजार झालेल्या रुग्णांसाठी महापालिकेने शहरातील दोन खासगी रुग्णालयाशी टायप केले होते. या रुग्णालय उपचार घेण्यासाठी रूग्णांना वायसीएम रूग्णालयाकडून रेफर चीट घ्यावी लागत होती. यामुळे इतर आजार झालेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली होती. याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने इतर आजार झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालय राखीव ठेवण्याची सुचना केली होती. त्यानुसार महापालिकेने वायसीएम रूग्णालय नाॅन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवले आहे.
शहरात महापालिकेच्या अॅटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटर, आकुर्डी, थेरगाव रूग्णालयात आयसीयूचे 424 बेड आहेत. तर 1 हजार 800 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये सध्य स्थितीत आयसीयूचे 15 टक्के बेड भरले असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.










Leave a Reply