Pimpri News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ निरीक्षकांच्या बदल्या
Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय ११ सहायक निरीक्षक फौजदारांच्याही बदल्या करण्यात आल्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे या बदल्यांमध्ये निगडी पोलीस ठाण्यातील ओटास्कीम भागासाठी आणि शस्त्र विरोधी पथकासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक देण्यात आलेले आहेत.
पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव यांची देहूरोड पोलीस ठाण्यातून पोलीस कल्याण शाखेत, राजेंद्र बर्गे यांची नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे, मनोज खंडाळे यांना नियंत्रण कक्ष ते विशेष शाखेत संलग्न केले. नियंत्रण शाखेचे निरीक्षक रंगनाथ उंडे यांची पिंपरी वाहतूक विभाग, डॉ. अमरनाथ वाघमोडे यांची तळवडे वाहतूक शाखा, विजया कारंडे यांची निगडी वाहतूक शाखा, शंकर डामसे यांची निगडी पोलीस ठाणे (ओटास्कीम), सुनील पिंजण यांची शस्त्र विरोधी पथक, वर्षाराणी पाटील यांची देहूरोड पोलीस ठाणे, ज्ञानेश्वर काटकर यांची गुन्हे शाखा युनिट १, तर मच्छिंद्र पंडित यांची गुन्हे शाखा युनिट ४ येथे आणि प्रसाद गोकुळे यांची एमओबी/ पीसीबी या ठिकाणी बदली केली आहे.
११ सहायक निरीक्षक, फौजदारांचाही बदल्यांमध्ये समावेश
सहायक निरीक्षक गणेश पवार यांची पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा, अंबरीश देशमुख यांची गुन्हे शाखा युनिट ४ ते शस्त्र विरोधी पथक, नियंत्रण कक्षातील फौजदार तुकाराम शेळके यांची पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांचे वाचक, महेश मुळीक यांची चिखली, श्रीनिवास दराडे यांची सांगवी, स्वप्नील वाघ यांची चिखली, शरद शिंपणे यांची तळेगाव दाभाडे, पौर्णिमा कदम यांची भोसरी, एमआयडीसी, प्रशांत रेळेकर यांची विशेष शाखा (एटीसी पथक), बाळासाहेब आढारी यांची विशेष शाखा व संतोष लांडे यांची चाकण पोलीस ठाण्यात बदली केली.










Leave a Reply