Maharashtra News : राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय,  विद्यापीठे, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

Maharashtra News : राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय,  विद्यापीठे, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

Pckhabar-कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील महाविद्यालयाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये ही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यतील विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात  येणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.

राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *