Dehu News : चिमुकल्या वरदच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला 18 हजार रुपयांच्या औषधांची मदत

Dehu News : चिमुकल्या वरदच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला 18 हजार रुपयांच्या औषधांची मदत

Pckhabar-सुनील कडुसकर यांनी आपला मुलगा वरदच्या वाढदिवसानिमित्त
देहूगाव कोविड सेंटरला 18 हजार रुपयांच्या औषधांची मदत केली आहे.

कोविड सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे ही औषधे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कडुसकर यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मुलाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कडुसकर कुटुंबाने ‘सेवा परमो धर्म’या उक्तीप्रमाणे कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या परिवाराचे कौतुक होत आहे.

कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांनी कडुसकर कुटुंबाचे आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *