Dehu News : तरुणांनी आपल्या मित्राला सामाजिक उपक्रमांद्वारे वाहिली श्रद्धांजली

Dehu News : तरुणांनी आपल्या मित्राला सामाजिक उपक्रमांद्वारे वाहिली श्रद्धांजली
Pckhabar- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि कै. मयूर माणिक हिंगे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र देहू येथे आयोजित केलेल्या मोफत कोविड तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये ७० रॅपिड अँटीजन टेस्ट,५२ अँटीबॉडी टेस्ट आणि २१ RTPCR टेस्ट मोफत करण्यात आल्या. त्याच बरोबर मयूरच्या स्मरणार्थ देहू कोविड सेंटर मधून कोरोनावर मात करून जाणाऱ्या ३५० रुग्णांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ५० गरजू कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.

मयुर हिंगे या तरूणाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या मित्रांनी सामाजिक बांधिलकी जोपासत
सामाजिक उपक्रमांद्वारे मयुरला श्रध्दांजली वाहिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *