Dehu News : जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचा पाठपुरावा अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

Dehu News : जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचा पाठपुरावा अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pckhabar- देहूगाव नगरपंचायतमध्ये कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांनी काल ( सोमवार) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासक तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना फोन करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश दिले.

देहूगाव नगरपंचायतमध्ये कंत्राटी पध्दतीने काही कर्मचारी काम करत आहेत.
कोरोना महामारीतही काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच ते सहा महिने वेतन मिळाले नव्हते. याची माहिती खंडागळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी
प्रशासक तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.

अखेर खंडागळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन मिळावे, अशी मागणी केली. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी
नगरपंचायतचे प्रशासक तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना त्वरित फोन करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आदेश दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *