Dehu Crime news: बायपास रोडवर पादचार्‍याला चौघांनी लुटले

Dehu Crime news: बायपास रोडवर पादचार्‍याला चौघांनी लुटले
Pckhabar-पायी जाणार्‍या एका तरूणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण करून खिशातील मोबाईल, रोकड असा 12 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. हा प्रकार देहूगाव बायपास रोडवर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

विकास सुरेश पाटील (वय-35, रा. साईनगरी, वडाचा माळ, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूगाव बायपास रोडने शनिवारी रात्री पायी जात होते. कचरा डेपोजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. त्यांना मारहाण करत खिशातून 7 हजार रूपये, 5 हजारांचा मोबाईल असा 12 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून तळवडेच्या दिशेने पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *