Pimpri news: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

Pimpri news: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
Pckhabar- कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. इंधन, गॅस दरवाढीसोबत खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांचेही कंबरडे मोडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनात केली.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, नगरसेवक  मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदीप चिंचवडे, विजय लोखंडे, सचिन औटे, माधव पाटील, संदीप उर्फ लाला चिंचवडे, कविता खराडे, यतीन पारेख, पल्लवी पांढरे, मनीषा गटकळ,  किरण देशमुख, संगीता कोकणे, अमोल भोईटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संजोग वाघेरे म्हणाले, पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. गॅसचे दर सातत्याने वाढविले जात आहे. कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, धंदे, व्यावसायावर झालेला आहे. या परस्थितीत केंद्रातील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, केंद्रातील सरकार इंधन, गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. केंद्र सरकारने म्हणजेच देशातील भाजप सरकारने आज जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. 10.26.26 ची किंमती 600 रुपयांनी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *