Maval News: कै.अक्षय अगरवाल यांच्या स्मरणार्थ 200 बॉक्स पाण्याचे वाटप

Pckhabar- देहूगाव येथील कर्तव्य
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कै. कु. अक्षय सतीश अगरवाल यांच्या स्मरणार्थ मावळ तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटर मधील कोरोना रुग्णांसाठी पाण्याच्या 200 बॉक्सचे वाटप मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्तव्य फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून देहूगाव आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. लाॅकडाऊन काळात फाऊंडेशनच्या वतीने गोर-गरीब नागरिकांना राशन वाटप, अन्नदान आदी महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत.
समाजाबद्दल आपले ‘कर्तव्य’ समजून फाऊंडेशन सर्व सदस्य सातत्याने गरजूंच्या मदतीसाठी धावून जातात.
दरम्यान, उद्योजक सतीश अगरवाल परिवारही नेहमी सढळ हाताने आर्थिक मदत करत असतात.










Leave a Reply