Dehu News : देहूगाव कोविड सेंटरला 40 हजार रुपयांच्या औषधांची मदत
Pckhabar- देहूगाव कोविड सेंटरला दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार आणि देहूतील कन्या विद्यालयाच्या उपशिक्षिका वंदना पवार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला औषधांची मदत केली आहे. त्याचबरोबर याच विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती अनिता आप्पासाहेब कुंभार यांनी ही औषधांची मदत केली आहे. पवार दाम्पत्य आणि कुंभार मॅडम यांनी तब्बल 40 हजार रूपये किंमतीची औषधे दिली आहेत.
देहूगाव कोविड सेंटरचे प्रमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांच्याकडे ही औषधे सुपूर्द करण्यात आली.
देहूगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी गेल्या काही दिवसात परिसरातील अनेक दानशूर नागरिकांनी विविध महत्त्वपूर्ण अशी मदत केली आहे.
दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार आणि देहूतील कन्या विद्यालयाच्या उपशिक्षिका वंदना पवार यांनी आपल्या लग्नाच्या 28 व्या वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासत कोविड सेंटरला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पवार दाम्पत्याने औषधांची मदत केली आहे.
उपशिक्षिका श्रीमती अनिता आप्पासाहेब कुंभार यांनी ही औषधांची मदत केली आहे.
पवार दाम्पत्य आणि कुंभार मॅडम यांनी तब्बल 40 हजार रूपये किंमतीची औषधांची मदत केल्यामुळे डॉ. किशोर यादव यांनी त्यांचे आभार मानले आहेत.










Leave a Reply