Pimpri news: लस साठा संपला, उद्या लसीकरण बंद!
Pckhabar-राज्य सरकारकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील उद्या (सोमवार) लसीकरण बंद राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे सोमवारी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
लसीकरण केंद्र बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी करु नये, असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.
आज (रविवार) शहरातील एक हजार 579 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर शहरातील 4 लाख 63 हजार 494 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे










Leave a Reply