Dehu News: कै. मंगल परदेशी यांच्या स्मरणार्थ भाळवनी आरोग्य मंदिरास 11 हजारांची मदत
Pckhabar-उद्योजक विशाल परदेशी यांच्या मातोश्री कै.मंगल प्रतापसिंह परदेशी यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने पारनेर, भाळवनी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरास 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी भाळवनी येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर उभारले आहे. 1100 बेडचे हे कोविड सेंटर आहे. या ठिकाणी अनेक गोर-गरीब कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या कोविड सेंटरला देश- विदेशातून आर्थिक मदत केली जात आहे. आमदार लंके यांच्या या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.
देहूगाव येथील उद्योजक विशाल परदेशी यांच्या मातोश्री कै.मंगल प्रतापसिंह परदेशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. मातोश्रींच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने विशाल परदेशी यांनी शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरास 11 हजार रुपयांची मदत केली आहे.










Leave a Reply