Dehu News: कोविड सेंटरला 200 ॲन्टीजेन टेस्टिंग किटची मदत
Pckhabar- देहूगाव येथील कोविड सेंटरला ॲन्टीजेन टेस्टिंग किटची अत्यावश्यक गरज आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता
सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश करके यांचे बंधू सुनील संपतराव कारके व गोरखनाथ बाळासाहेब काळोखे यांच्यावतीने २०० ॲन्टीजेन टेस्टिंग किटचे आज (रविवार) भेट देण्यात आले.
कोविड सेंटरचे प्रमुख आणि देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, श्रवण हगवणे, अजित काळोखे, ओंकार काळोखे, गोरख मंजुळे आदी सामाजिक क्षेत्रात काम करणारे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
देहूगाव कोविड सेंटरला ॲन्टीजेन टेस्टिंग किटची आवश्यकता होती. तसेच पुणे जिल्हा परिषदेकडून हवा तितका किट पुरवठा होत नसल्याने सुनील संपतराव कारके व गोरखनाथ बाळासाहेब काळोखे यांनी २०० ॲन्टीजेन टेस्टिंग किट भेट दिले. सामाजिक जाणीव आणि रुग्णांची गरज ओळखून कोविड सेंटरला मदत करणाऱ्या मान्यवरांचे कौतुक केले जात आहे.
कोविड सेंटरला ॲन्टीजेन किटची मदत केल्याबद्दल कारके आणि काळोखे यांचे डॉ. किशोर यादव यांनी आभार मानले.










Leave a Reply