Dehu News : कै. मंगल परदेशी यांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरला 200 ॲन्टीजेन चाचणी किट, 55 कुटुंबांना राशन

Dehu News : कै. मंगल परदेशी यांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरला 200 ॲन्टीजेन चाचणी किट, 55 कुटुंबांना राशन
Pckhabar- देहूगाव येथील कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरूच आहे. कै.मंगल प्रतापसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ विशाल परदेशी यांनी कोविड सेंटरला 20 हजार रुपये किंमतीचे 200
ॲन्टीजेन चाचणी किट भेट दिले. तसेच 55 गरजू कुटुंबांसाठी राशन किटचे वाटप करण्यात आले.

ॲन्टीजेन किट कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

विशाल परदेशी यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ कोविड सेंटरची गरज ओळखून 200 ॲन्टीजेन चाचणी किट भेट दिले आहेत.

याबाबत कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव म्हणाले” दुःखाच्या प्रसंगीही विशाल परदेशी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोविड सेंटरला मदत केली आहे. याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत”.

तसेच लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोर-गरीब नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा गरजू कुटुंबांसाठी विशाल परदेशी यांनी 55 राशन किटचे कर्तव्य फाऊंडेशन मार्फत वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *