Dehu News : लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सिंधूजल सेवेतर्फे शुद्ध पाण्याची व्यवस्था

 

Dehu News : लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सिंधूजल सेवेतर्फे शुद्ध पाण्याची व्यवस्था
Pckhabar- देहूगाव परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना देहूगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन अभंग प्रतिष्ठानचे मा.अध्यक्ष नारायण तथा तात्या पाचपिंड यांच्या सिंधूजल सेवेच्या माध्यमातून शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आज (शनिवार) उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, जि. प. सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे, सचिन कुंभार, मच्छिंद्र परंडवाल, संजय जंबुकर, सागर मुसुडगे, सचिन हगवणे, सचिन काळोखे, प्रकाश मोरे, सुरेश कातोरे, विकास कंद उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्रात यापुढील काळात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल नारायण तथा तात्या पाचपिंड यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *