Pimpri Mucro mycosis news: ’म्युकरमायकोसिस’ आजारामुळे शहरात 12 जणांचा मृत्यू
Pckhabar- कोरोनानंतरचे साईड इफेक्ट, शरीराची कमकूवत रोगप्रतिकारक शक्ती यामुळे काही कोरोनामुक्त रूग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. या आजाराचे पिंपरी-चिंचवड शहरात 75 पेक्षा जास्त सक्रीय रूग्ण आहेत. या आजारामुळे 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वायसीएम रुग्णालयात एका दिवसात चार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसरी लाट ही अधिक घातक आहे. या लाटेत तरूण रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या लाटेत आताशी कुठे रूग्ण संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. या आजाराचे शहरात 75 हून अधिक रुग्ण सक्रीय आहेत. वायसीएम, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी.वाय पाटील रुग्णालयात या आजाराचे रुग्ण आहेत.
वायसीएम रुग्णालयात गुरुवारपर्यंत या आजारामुळे 8 जणांचा तर, खासगी रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे अनेकांना डोळे गमवावे लागत आहेत. हा आजार वेळीच लक्षात आला आणि त्यावर तातडीने उपचार झाले, तर तो बरा होतो.










Leave a Reply