Chinchwad news: उद्योजक रामेश्वर जगताप यांचे निधन

 

Chinchwad news: रामेश्वर जगताप यांचे निधन
Pckhabar- वाल्हेकरवाडी येथील उद्योजक रामेश्वर कल्याण जगताप यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी रात्री निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

रामेश्वर जगताप हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वाकडी गावचे रहिवासी होते. नोकरीनिमित्त 25 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ते स्थायिक झाले होते. नोकरी करत असतानाच त्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

रामेश्वर जगताप यांच्यावर रावेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांचे ते मावस बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *