Pimpri crime news: आमदार  अण्णा बनसोडे यांच्या मुलासह 15 जणांवर गुन्हा

Pimpri crime news: आमदार  अण्णा बनसोडे यांच्या मुलासह 15 जणांवर गुन्हा


Pckhabar- एका कंपनीच्या सुपरवायझरचे अपहरण करून लोखंडी राॅड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह 15 जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुपरवायझरने बघून घेण्याची धमकी देत आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याची याच्या परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.  हा प्रकार बुधवारी दुपारी पिंपरी येथे घडला.

तर कालच्या गोळीबार प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे.

सिद्धार्थ अण्णा बनसोडे ,  सावंत कुमार, लांडगे, साजिद, सुलतान यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ॲथोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे आमदार बनसोडे यांच्या पीएला उलटे बोलल्याचे समजून आकुर्डी येथील हेडगेवार भवन शेजारी असलेल्या कार्यालयातून पवार यांचे आमदार बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केले.
आमदार बनसोडे यांच्या मुलासह सावंत कुमार, लांडगे, साजिद, सुलतान यांच्यासह 15 जणांनी पवार यांना लोखंडी राॅड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तर या विरोधात आमदार बनसोडे यांचा कार्यकर्ता सावनकुमार रमेश सल्लादलू (वय-48, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ॲथोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी पवार हा ॲन्थोनी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. त्याच्या कंपनीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कचरा उचलण्याचा ठेका मिळाला आहे.  यामध्ये स्थानिक तरूणांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, यासाठी आमदार बनसोडे यांनी पवारला चर्चेसाठी बोलविले होते.  यावेळी आरोपींनी आमदार बनसोडे यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली.  तसेच आमदार बनसोडे, त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने आरोपीने गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

तसेच कार्यालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आमदार बनसोडे यांच्या मुलासह 8 जणांवर निगडी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी निगडीतील आकुर्डी येथील हेडगेवार भवन  शेजारील कार्यालय घडला. याप्रकरणी स्वाती सचिन कदम  (वय- 39,रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *