Pimpri Corona news: रूग्ण संख्या पुन्हा वाढली, 3 हजार 305 नवे रूग्ण

Pimpri Corona news: रूग्ण संख्या पुन्हा वाढली, 3 हजार 305 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येने पुन्हा तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली रूग्ण संख्या अचानक पुन्हा वाढली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  महापालिका 31 हजार 305 नवे रूग्ण आढळले आहेत. 71 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 884 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

    शहरात आत्तापर्यंत 2 लाख 36 हजार 209 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 11 हजार 871 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 469 तर हद्दीबाहेरील 1 हजार 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 10 हजार 180 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 8 हजार 966 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 11 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 2 हजार 295 घरांना भेटी देऊन 7 हजार 881 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरात मेजर कन्टेंन्मेंट 352 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 41 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 44 हजार 381 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *