Pimpri crime news: जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा चौथा प्रकार उघडकीस

Pimpri crime news: जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा चौथा प्रकार उघडकीस
Pckhabar- नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. रुग्णांच्या मौल्यवान साहित्य चोरीचा बुधवारी चौथा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी प्रविण अंबादास सुतार (वय-48, रा. भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुतार हे नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. उपचार घेत असताना सुतार यांचे
21 हजार 400 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा चौथा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णांचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *