Pimpri news: कर्तव्याचा वसा आणि वारसा घेऊन सर्वजण एकजुटीने काम करीत आहोत : के . डी. रत्नपारखी
कर्मवीर पुण्यतिथीनिमित्त आंदराजली !!
Pckhabar- कर्मवीरांनी शंभर वर्षापूर्वी दूरदृष्टीने विचार करून रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका ही योजना राबवली, श्रमदानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. एका काडी पेक्षा पेंढीचे महत्त्व अधिक असते, हे समजावून दिले. तसेच कर्तव्याचा वसा आणि वारसा घेऊन आपण सर्वजण कोरोना काळामध्ये एकजुटीने रहाण्याचे व मानसिक आरोग्य सांभाळण्याचे काम करीत आहोत , ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड शिक्षकांनी पडू दिलेला नाही. तांत्रिक कौशल्य आत्मसात करून शिक्षक आपले अध्यापनाचे काम अविरतपणे करीत आहेत,असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी के . डी. रत्नपारखी यांनी केले.
नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 62 व्या पुण्यतिथी ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी के. डी.रत्नपारखी बोलत होते.
या ऑनलाईन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे र.शि. संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी के. डी.रत्नपारखी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, संजोग वाघेरे पाटील हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये भाऊसाहेब वाघेरे ,चेअरमन ,स्थानिक सल्लागार समिती ,नवमहाराष्ट्र विद्यालय, हनुमंतराव नेवाळे, सदस्य, स्कूल कमिटी, कन्या विद्यालय हे उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षक वृंद ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित होते.
या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व पालक हे ही सहभागी झाले होते .यावेळी नवमहाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी शिवाजी बधाले व अनुकूल चंदनशिवे तसेच कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी भूमिका यादव व अंशू दराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व कर्मवीरांच्या प्रती आदरांजली अर्पण केली.
शिक्षक मनोगतामध्ये उपशिक्षिका मीनल साकोरे व अनघा रांगणेकर यांनी कर्मवीरांचा जीवनपट आपल्या भाषणातून साकार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवमहाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी केले.या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नवमहाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पी. एम. शेख पर्यवेक्षक शरद परदेशी, नवनाथ कुंभार तसेच कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख नीता शेटे यांनी केले. आभार कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी मानले.
हा कार्यक्रम जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचावा व्हावा म्हणून, नवमहाराष्ट्र विद्यालय व कन्या विद्यालयाच्या फेसबुक पेजवर ही अपलोड करण्यात आलेला आहे. या सुट्टीच्या कालावधी मध्ये नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.










Leave a Reply