Pimpri news: कोरोनामुक्त झालेल्यांनी मौखिक आरोग्याबद्दल जागरूक रहावे: दंतरोग तज्ज्ञ अमित नेमाणे
Pckhabar-कोरोना होऊन गेलेल्या आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी मौखिक आरोग्याबद्दल रहावे अतिशय जागरूक रहावे, असे आवाहन दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांनी नागरिकांना केले आहे.
दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे म्हणाले” अतिशय दुर्मिळ असलेला म्युकर मायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार आज अनेक रुग्णांमध्ये पहावयास मिळत आहे. Covid-19 होऊन गेलेल्या अनेक रुग्णांमध्ये तोंडामध्ये किंवा वरील जबड्याच्या आतील बाजूस बुरशी सारखा पांढरा किंवा काळसर चट्टा असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रकारचा काळसर छटा ओठांच्या बाहेरील किंवा आतील बाजूस त्याच बरोबर नाक ,सायनस या मध्ये जर आपल्याला जाणवत असेल किंवा चेहऱ्याला, जबड्याला वेदना , दात दुखी, दाताच्या खाली सूज येणे त्यात पु होणे अशा कुठल्याही प्रकारची लक्षणे आपल्याला आढळल्यास आपण तात्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते , कारण अशा स्वरूपाचा आजार किंवा काळसर चट्टा वाढून डोळे , नाक , सायनस आणि अगदी मेंदू पर्यंत पोहोचू शकतो. साधारणतह याची सुरुवात तोंडात होत असल्याचे अधिक पाहण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक पातळीवर जर याचे निदान झाले तर त्यावर योग्य उपचार करता येतात, असे दंतरोग तज्ञ डॉ. अमित नेमाने यांनी पिंपरी-चिंचवड खबर वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.
कोरोना विषाणूचा उपचारादरम्यान स्ट्रॅिराॅइड सारख्या औषधांचा वापर सर्रास केला जातो. यातच आपणास मधुमेह किंवा रक्तदाब असेल तर स्टिरॉइड्स चा वापर बऱ्याचदा रुग्णांना जीवदान देणारा ठरतो. मात्र अशा स्ट्रॅिराॅइड औषधांच्या वापरामुळे सर्वसामान्य रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अगदी सौम्य होते , त्यातच मधुमेहासारखे दुर्धर आजार असल्याकारणाने रोगप्रतिकारक क्षमता यापूर्वीदेखील क्षीण झालेली असते , याचाच फायदा बुरशी सारखे जिवाणू उचलतात आणि रुग्णांना अशा बुरशीजन्य आजाराची लागण होते. बुरशी व्यतिरीक्त अन्य संधी साधू आजार देखील डोके वर काढतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता, आपले मौखिक आरोग्य जपावे. वरील आजारांची काहीही लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपला दंतरोग तज्ञ, आपले डोळ्याचे डॉक्टर, आणि आपले कान नाक घसा याचे डॉक्टर यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणे अधिक योग्य मानले जाईल. त्याचबरोबर कोरोनामधून बरे झाल्यानंतर,आपला आहार,मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे या काळात अधिक गरजेचे आहे, असे आवाहनही डॉ. नेमाणे यांनी नागरिकांना केले आहे.










Leave a Reply