Dehu News : लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला ॲन्टीजन चाचणी किट भेट

Dehu News : लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला ॲन्टीजन चाचणी किट भेट
Pckhabar- लग्नाच्या वाढदिवसाचा
खर्च टाळून देहूगाव येथील कोविड सेंटरला टाटा मोटर्सचे अधिकारी अभिजित चंद्रशेखर आणि आदर्श शिक्षिका चंद्रशेखर मॅडम यांच्या वतीने 10 हजार रुपयांचे 100 ॲन्टीजन चाचणी किट भेट देण्यात आला.

ॲन्टीजन चाचणी किट चंद्रशेखर दाम्पत्याने कोविड सेंटरचे प्रमुख तथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात केला.

अभिजित चंद्रशेखर हे टाटा मोटर्स मध्ये
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नी देहूगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या 14 व्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कोविड सेंटरला 10 हजार रुपयांचे 100 ॲन्टीजन चाचणी किट भेट दिला. चंद्रशेखर दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या या मदतीमुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

कोविड सेंटरची गरज ओळखून चंद्रशेखर दाम्पत्याने केलेल्या या मदतीमुळे कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांनी त्यांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *