Dehu News: कर्तव्य फाउंडेशनतर्फे 223 कुटुंबाना राशन वाटप

Dehu News: कर्तव्य फाउंडेशनतर्फे 223 कुटुंबाना राशन वाटप
Pckhabar-कोरोना महामारीमुळे सध्यस्थितीत महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबापुढे दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देहू येथील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत हातावर पोट भरणाऱ्या 223 कुटुंबांना राशन किट वाटप करण्यात आले.

कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य सातत्याने समाज उपयुक्त उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. गेल्या वर्षीही लाॅकडाऊनमध्ये कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने गोर-गरिबांना जेवन आणि राशनचे वाटप केले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता अधिक आहे. हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबापुढे दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने गेल्या पाच दिवसात देहू पंचक्रोशीतील 223 गरजू कुटुंबांना हे राशन किट वाटण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध पणे व शासनाच्या नियमांचे पालन करीत हे राशन वाटप करण्यात आले.

या राशन वाटपसाठी देहूतील दानशूर व्यक्ती, कर्तव्यचे सदस्य यांनी हातभार लावला. संस्थेचे सदस्य स्वतःचा कोणताही दिखावा न करता गरजूं पर्यंत पोहचणारी संस्था म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात कर्तव्य फाऊंडेशन देहूची ओळख आहे.

गरजू कुटुंब असतील तर राशन साठी नागरिकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.

संपर्क: 7040239257, 7038349858, 9975234614, 9921950724, 8308101044, 9763737711, 7774095124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *