Pimpri news: कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
Pckhabar- पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, उपमुख्याध्यापक शेख पी.एम. पर्यवेक्षिका उर्मिला पाटील व इतर ज्येष्ठ सहकारी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी विद्यालयांमध्ये असणार्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील म्हणाले” अण्णाचे जीवन चरित्र आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे, त्यांनी घेतलेले शिक्षणसेवेचे व्रत आज लाखो रयत सेवक निस्सीम सेवाभावी वृत्तीने पुढे नेत आहेत”.
इ.५ वी ते १० वी चे प्रवेश सुरु केले असून, मागील वर्षी केलेल्या शैक्षणिक online कामासाठी सर्व शिक्षकाचे कौतूक केले. तसेच मुलाना या कार्यक्रमात सहभागी होता यावे, म्हणून online सभेच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. त्याद्वारे कोरोना कालावधीत विद्यालयाने केलेले उत्कृष्ट कार्य पालक वर्गासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे, असे मतही प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डी. पी. गुरव, एस. बी. कुलुमकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे, गीतांजली शिंदे, आर. आर. आडमुठे आदि उपस्थित होते.










Leave a Reply