Pimpri news: नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड यांचा यशस्वी पाठपुरावा अन् ‘स्पर्श’ला गुंडाळावा लागला गाशा
मोफत बेडसाठी मुख्याध्यापिकेकडून घेतले होते एक लाख रुपये
Pckhabar-चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधील महापालिकेचे कोविड हॉस्पिटल संचलन करणाऱ्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेचा भ्रष्ट कारभार भाजप नगरसेवक विकास डोळस आणि कुंदन गायकवाड यांनी उघडकीस आणत त्याचा पाठपुरावा केला. मोफत उपचाराची सुविधा असतानाही चिखलीतील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून एक लाख रुपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आणले. त्यावर आक्रमकपणे महापालिका सभागृहात आवाज उठविला. स्पर्शच्या सल्लागारासह तीन डॉक्टरला बेड्या पडल्या आणि अखेरिस महापालिकेने आज ‘स्पर्श’चा ठेका काढून घेतला. नगरसेवक डोळस, गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ‘स्पर्श’ला गाशा गुंडाळावा लागला.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करत होती. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये चिखलीतील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी खासगी हॉस्पिटलच्या मदतीने ‘स्पर्श’च्या सल्लागाराने एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार नगरसेवक डोळस आणि गायकवाड यांनी उघडकीस आणला. याबाबत सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. अनेकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, आपल्या शिक्षिकेला मोफत उपचाराची सुविधा असतानाही एक लाख रुपये भरावे लागल्याचे दुःख नगरसेवक गायकवाड यांना होते. त्यामुळे ‘स्पर्श’ला धडा शिकवायचाच असा निर्धार गायकवाड, डोळस यांनी केला. त्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ दिली.
स्पर्शच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नगरसेवक डोळस, गायकवाड यांनी वेळोवेळी आवाज उठविला. स्पर्श विरोधात पोलिसांत तक्रार देण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत स्पर्शचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे आणि एका महिला डॉक्टरला अटक केली. अखेरिस एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श चालवित असलेले ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह तत्काळ प्रभावाने आजपासून अधिग्रहित केले. तसेच स्पर्शला काळ्या यादीत का टाकू नये, फौजदारी कारवाई का, करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावत चार दिवसांत खुलासा मागविला आहे. नगरसेवक विकास डोळस, नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश आले.
नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले, “स्पर्शने चिखलीतील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून बेडसाठी एक लाख रुपये घेतले होते. हे अतिशय चुकीचे आणि संतापजनक होते. याविरोधात मी आणि नगरसेवक विकास डोळस यांनी महापालिका सभागृहात आवाज उठविला. कारवाई करण्याची मागणी लावून धरली. अखेर महापालिकेने स्पर्शचा ठेका काढून घेतला. चुकीच्या कामविरोधातील आमच्या लढ्याला यश आले. आम्हाला सहकार्य करणारे नगरसेवक, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांचे मी आभार मानतो”.










Leave a Reply