Pimpri news: स्पर्श संस्थेला मोठा झटका, ऑटो क्लस्टर कोविड सेंटरची सेवा महापालिकेकडे

Pimpri news: स्पर्श संस्थेला मोठा झटका, ऑटो क्लस्टर कोविड सेंटरची सेवा महापालिकेकडे
Pckhabar- मोफत बेडसाठी पैसे घेणे, रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणे आदी गंभीर बाबी ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणार्‍या स्पर्श हॉस्पीटल संस्थेत उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे स्पर्श प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेेचा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ठेका रद्द केला असून या सेंटरची सेवा रविवारपासून महापालिकेकडे सर्व कर्मचार्‍यांसह अधिगृहित करण्यात आली आहे. तसेच  महापालिकेसोबत केलेल्या कराराचा भंग केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे स्पर्श हॉस्पीटलला काळ्या यादीत का टाकू नये अथवा फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. या नोटीसीचे चार दिवसात उत्तर देण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.

ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणार्‍या स्पर्श हॉस्पीटलमध्ये विविध गैरप्रकार समोर आले होते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे त्वरित स्पर्श संस्थेवर कारवाई करा, अशा सुचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना  पत्र पाठवून केल्या होत्या. याची दखल घेत पाटील यांनी रविवारी स्पर्श संस्थेचा ठेका रद्द करून ही सर्व सेवा अधिगृहीत केली आहे.

महापालिकेने ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर मे. स्पर्श हॉस्पीटलला चालविण्यासाठी दिले होते. मात्र, या हॉस्पीटलच्या वतीने समाधानकारक सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच या कोविड सेंटरमध्ये महापालिका शाळेतील मुख्याध्यापिकेला बेडसाठी पद्मजा हॉस्पीटल, वाल्हेकरवाडी, चिंचवड, यांच्याशी संगनमत करुन  1 लाख रूपये स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडचे कन्सलटंट म्हणून डॉ. प्रविण जाधव यांनी घेतले होते.  आरोपी जाधव यांनी 80 तर  डॉ. सचिन श्रीरंग कसबे आणि डॉ. शशांक भरत राळे यांनी 20 हजार रूपये घेतले होेते. तसेच यामध्ये आणखी एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती. शनिवारी  कोविड सेेंटरमध्ये काम करणार्‍या स्पर्श हॉस्पीटलच्या एका ब्रदरला रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे.

 स्पर्श प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेेचा सर्व गैरप्रकार उघडकीस आल्याने  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या संस्थेचा ठेका रद्द केला असून या सेंटरची सेवा रविवारपासून महापालिकेकडे सर्व कर्मचार्‍यांसह अधिगृहित करण्यात आली आहे. तसेच महापालिकेसोबत केलेल्या कराराचा भंग केल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे स्पर्श हॉस्पीटलला काळ्या यादीत का टाकू नये अथवा फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. या नोटीसीचे चार दिवसात उत्तर देण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.

तसेच कोविड सेंटरमधील सर्व पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधे, माहिती सुस्थितीत कोविड सेंटरचे प्रभारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे सुपूर्द करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास वैद्यकीय उपचारांमध्ये बाधा येईल, असे कृत्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष केल्यास स्पर्शचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंदे आणि संपूर्ण व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, मागील वर्षी कोरोना साथीचे दरम्यान स्पर्श संस्थेने भोसरी येथे रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या दोन ठिकाणी कोवीड केअर सेंटर चालविले जात होते. या ठिकाणी एकाही रूग्णांवर उपचार न करताच पाच कोटी 26 लाख रुपयांचे खोटे बिल सादर केल्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयएएस दर्जाचे अधिकार्‍यांचे मार्फत चौकशी सुरू आहे.

कोविड सेंटरच्या कामकाजासाठी यांची नियुक्ती

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप- मुख्य समन्वयक अधिकारी, प्रभारी
डॉ. अभयचंद्र दादेवार- वैद्यकीय समन्वयक, प्रभारी
डॉ. मनजीत संत्रे- प्राध्यापक
डॉ. संतोष थोरात- सहयोगी प्राध्यापक डॉ. अतुल देसले- सहायक प्राध्यापक
डॉ. शगुन पिसे- वैद्यकीय अधिकारी
डॉ. आनंद करळे-सहयोगी प्राध्यापक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *