Pimpri news: विनामास्क फिरणार्‍या 361 जणांवर कारवाई

Pimpri news: विनामास्क फिरणार्‍या 361 जणांवर कारवाई
Pckhabar- कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेकजण विनामास्क शहरात फिरत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी विना मास्क फिरणार्‍या 361 जणांवर कारवाई करण्यात आली.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विनामास्क फिरणार्‍या 361 जणांवर कारवाई केली. एमआयडीसी भोसरी (37), भोसरी (12), पिंपरी (25), चिंचवड (69), निगडी (16), आळंदी (21), चाकण (27), दिघी (03), सांगवी (10), वाकड (12), हिंजवडी (36), देहूरोड (25), तळेगाव दाभाडे (16), तळेगाव एमआयडीसी (04), चिखली (14), रावेत चौकी (12), शिरगाव चौकी (19), म्हाळुंगे चौकी (03) या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *