Dehu News : देहू कोविड सेंटरला 40 हजार रुपयांच्या 250 टेस्टिंग किटची मदत

Dehu News : देहू कोविड केंद्राला 250 टेस्टिंग किटची मदत
Pckhabar- देहूगाव परिसरात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषदेकडून ॲन्टीजेंन टेस्टिंग कीट कमी प्रमाणात येत आहेत. कोविड सेंटरला ॲन्टीजेंन टेस्टिंग कीटची गरज ओळखून माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, रोटरी क्लब देहू मा. अध्यक्ष भैय्यासाहेब कारके, प्रगतशील शेतकरी मधुकर हगवणे यांच्या वतीने 40000 रुपये किंमतीचे तब्बल 250 कोविड टेस्टिंग किट भेट देण्यात आले.

श्रीक्षेत्र देहू येथील कोविड सेंटरचे मुख्य तथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे ॲन्टीजेंन टेस्टिंग कीट सुपूर्द करण्यात आले. यावेळी विक्रीकर निरीक्षक दिनेश कारके, विक्रीकर निरीक्षक स्वप्निल मोरे, ऍड. विक्रम हगवणे, अजित काळोखे, ओंकार काळोखे आदी सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देहूसह माळवाडी, विठ्ठलवाडी या भागातील नागरिकांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या दानशूर आणि जागरूक नागरिकांनी देहूतील नागरिकांच्या तपासणीसाठी योग्य वेळी कोविड केंद्राला मदत केल्यामुळे नागरिक कौतुक करत आहेत.

माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे म्हणाले की ” देहूगाव परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत 1 हजार 156 रुग्ण उपचार घेऊन कोरोना मुक्त झाले आहेत. कोविड सेंटरमधील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनीही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे”, असे आवाहनही काळोखे यांनी केले.

याबाबत कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव म्हणाले ” कोविड सेंटरला ॲन्टीजेंन टेस्टिंग कीटची गरज ओळखून माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, रोटरी क्लब देहू मा. अध्यक्ष भैय्यासाहेब कारके, प्रगतशील शेतकरी मधुकर हगवणे यांनी मोलाची मदत केली आहे. त्याबद्दल कोविड सेंटरच्या वतीने मनापासून आभारी आहोत”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *